Title | Hits |
---|---|
Press Releases | Hits: 817 |
Photo Caption: Suryadatta Junior College Students presenting their science project to Ms. Jyostsna Mishra – Vice president Principals Forum, NASA Scientist Leena Bokil, Mr,Balasaheb Ovhal, Asst.Director- Education Pune Division, Prof. Dr. Sanjay B. Chordiya Dean Academics Suryadatta Group Pune and Adv. Shrikant Patil
11th April Pune: To stop the brain drain we must possess strong infrastructure and study labs so that Indian brains can contribute in abundance in research from which the country will be benefitted. For that, there is an urgent need to come up with ‘model schools’ on the national level which would work on the concepts imbibed by benchmark institutes like IIM- IIT,” said Leena Bokil, Scientist, NASA.
She was speaking at the inauguration of science exhibition organized by Suryadatta National School, Suryadatta College in association with Shastravahini group. Also present for the occasion were Dinkar Temkar, Dy Director & Balasaheb Ovhal, Asst.Director- Pune Shikshan Mandal, Jyotsna Mishra, Chairman, CBSE Sahyodya Committee, Shrikant Patil, Trustee, Ayurved Rasshala and Sanjay Chordia, Chairman, Suryadatta Group of Institutes.
Under the guidance of Shastravahini group, students prepared various models illustrating naturally present machines, Apparatus of different batteries to demonstrate the power of Electricity, simple magnifier, Objects based on the ideas of big telescope to fine view microscope, the use of subject geometry to derive interesting games, attractive earthworks, scientific toys and more were the elements of the science exhibition.
Ovhal said, “Nowadays readymade projects are easily available in the market. But if students make assigned projects all by themselves that is what will help them and stay with them always. Therefore schools should consider taking up such exhibitions to help students create interest in science, mathematics and other subjects.
Chordia said that it is important that we inculcate in students the idea of understand and learn. Such kind of exhibitions makes students more sensible.
The exhibition will be open to all till 13th April from 10 to 6.
राष्ट्रीय प्रकल्प शाळांची निर्मिती देशाच्या हिताची- शास्त्रज्ञ लिना बोकील
पुणे :आपल्या देशात बुध्दीमत्ता आहे पण त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे. जर सरकारने प्रत्येक शहारांमध्ये आयआयटीसारख्या राष्ट्रीय पातळीवर चालणा-या प्रकल्प शाळांची निर्मिती केलीतर विद्यार्थ्यांना आपण जे शिक्षण घेतोय त्या शिक्षणाची गोडी लागेल व देशहितासाठी अनेक गोष्टी या प्रकल्प शाळांच्या माध्यमातून होवू शकतील, असे मत नासाच्या शास्त्रज्ञ लिना बोकील यांनी व्यक्त केले.
सुर्यदत्ता नॅशनल स्कुल, सुर्यदत्ता कॉलेज आणि शास्त्रवाहिनी ग्रुप यांच्या वतीने तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पुणे शिक्षण मंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक बाळासाहेब ओव्हाळ, सिबीएसी सहयोदया कमिटीच्या अध्यक्षा ज्योत्ना मिश्रा, बावधन ग्रामपंचायतीचे अध्यक्ष किरण दगडे, आयुर्वेद रसशाळेचे विश्वस्त ऍड. श्रीकांत पाटील, शास्त्रवाहिनीचे प्रमुख माधव खरे, सुर्यदत्ता इस्टिट्यूटचे संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडीया आदी उपस्थित होते.त्यावेळी बोकील बोलत होत्या.बोकील यांच्या राष्ट्रीय प्रकल्प शाळांच्या निर्मिती मताला सर्व उपस्थितांनी दुजोरा दिला.
या प्रदर्शनात सुर्यदत्ता इन्स्टिट्यूच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रवाहिनीच्या मार्गदर्शनाखाली स्वतः तयार केलेल्या विज्ञान वस्तूंचा समावेश करण्यात आला. निर्सगामध्ये कार्यरत असलेली स्वयंचलित यंत्रे, विद्युत शक्तीची परिमाणं दाखवण्या-या विविध बॅटरीज, साधे भिंग, अजस्त्र दूरदर्शकापर्यंत ते प्रखर सुक्ष्मदर्शकापर्यंत तयार केलेल्या काही दुष्टीभ्रम करणा-या वस्तू, भुमिती या विषयातील विविध गमती जमती दाखवणारी खेळणी, मनोरंजक मातीकाम, विविध प्रकारची विज्ञान खेळणी यासारख्या तब्बल 30 प्रयोगांच्या अविष्कारांचा समावेशया प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर संदेश देताना बोकील म्हणाल्या, विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि संशोधनात्मकरित्या वेगळ्या धर्तीवर काम करता यायला हवे. यासाठी अशा प्रकल्प शाळांची गरज आज देशाला आहे. विज्ञानाची माहिती भारतात घ्यायची आणि त्यासाठीचे प्रयोग परदेशात जाऊन करायचे आणि त्याचे सर्व श्रेय परदेशाला जाते. हे कुठतरी थांबायला हवे. आपल्या देशातच प्रयोग व्हावेत तशी व्यवस्था, प्रयोगशाळा आपल्या देशात असण्याची आवश्यकता आहे. वैज्ञानिक कल्पना चावला सोडल्या तरविद्यार्थ्यांना आपण शास्त्रज्ञांचे आदर्शदाखवतच नाही. आपल्या देशासाठी योगदान देणा-या शास्त्रज्ञांची माहितीही मुलांना मिळावी, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत. असेही बोकील म्हणाल्या.
बोकील मताला दुजोरा देत ओव्हाळ म्हणाले, मुलांना अभ्यासाची शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनपातळीवर विविध प्रयोग चालू आहेत. हल्ली शाळांमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट दिले जातात. तसे प्रोजेक्ट सध्या बाजारात विकतही मिळतात. विद्यार्थ्यांनी स्वतः केलेले प्रयोग आयुष्यभर लक्षात राहतात. त्यामुळे अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची, गणिताची गोडी लागते, असे ओव्हाळ यांनी सांगतले.
ज्योत्ना मिश्रा म्हणाल्या, मॉडेल शाळांसारख्या प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांवर अतिशय मेहनत घेण्याची गरज आहे. तरच मुलांना भाषेची, विज्ञानाची, गणिताची गोडी लागू शकते. पालक त्यासाठी मोठाल्या फिज देण्यास तयार आहेत. पण सध्याचे शिक्षण फक्त पदवी पदरात पाडून घेण्याचे शिक्षण आहे. हुशारीची परिमाणे मार्कांवर आधारित आहेत. हे बदलायला हवे. विद्यार्थ्यांना कितपत समजलॆ, याची कुठेतरी नोंद होण्याची गरज आहे. हल्ली तर कुणालाही नापास करायचे नाही, असे धोरण अवलंबविल्यामुळे फक्त पदवीच्या मागे असलेली पिढी शिक्षणाच्या चरख्यातून बाहेर पडत आहे.
सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटसारख्या संस्था या प्रदर्शनाच्या,विविध उपक्रमांच्या माध्यमातून समजून-उमजून शिका हा शिक्षणाचा मुलमंत्र विद्यार्थ्यांना देताहेत ही आभिमानाची गोष्ट आहे.
डॉ.चोरडिया म्हणाले, विद्यार्थ्यांनी समजून घेऊन शिकावे, यासाठी संस्था अनेक प्रकल्पराबवित असते. मुलांच्या प्रगल्भतेला चालना देण्यासाठी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांनीच विज्ञान आपल्याला समजून सांगावे, ही मनोभुमिका त्यामागे आहे.
हे विज्ञान प्रदर्शन १३ एप्रिल पर्यंत सकाळी १० ते ६ वेळेत सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट, बावधन इथे सर्वासाठी खुले राहिल.
For Further Queries Contact 8956932415 Or 7776072000